जय मल्हार मिनीडोअर रिक्षा चालक संघटनेच्या उरण नाका, पनवेल येथील नामफलकाचे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
जय मल्हार मिनीडोअर रिक्षा चालक संघटनेच्या उरण नाका, पनवेल येथील नामफलकाचे अनावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते कि दिवसभरातील कमार्इ समाधाने घरी नेता येर्इल त्यातून कुटूंबाचा उदरनिर्वाह होर्इल ही आशा रिक्षाचालकांची असते मात्र त्यांच्या कमार्इतील हिस्सा लुटण्याचे काम गेले अनेक वर्ष नाक्यावर झाल्याने रिक्षाचालक हवालदिल झाले. त्यामुळे त्यांच्या संयमाचा बांध फुटला व त्यांनी आपल्या
व्यथा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे मांडल्या. त्यानुसार येथे जय मल्हार रिक्षा संघटनेचा नाका सुरू झाला असून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तुमचे प्रश्न समस्या सोडविण्याबरोबरच तुमच्या उन्नत्तीसाठी
सहकार्य केले जार्इल असे सांगतानाच प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार याची दक्षता घेऊन ग्राहकांची सेवा र्इश्वर सेवा आहे या उक्तीप्रमाणे सदैव कार्यरत रहा असा सल्लाही त्यांनी यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित रिक्षाचालकांना दिला.तसेच त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.