पनवेल तालुक्यातील केळवणे खाडीवर असलेला संरक्षण बंधारा फुटल्याने केळवणे गावात खाडीचे पाणी घुसून रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तहसिलदार दिपक आकडे यांनी येथील परिस्थितीची पहाणी केली.तसेच खाडीचे पाणी आत शिरत असलेल्या ठिकाणाची स्वतः ग्रामस्थाबरोबर छोट्या होडीत बसून पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त ग्रामस्थांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले. केळवणे गावालगत असलेल्या खाडीच्यापाण्यापासून गावकर्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शासनाच्या वतीने संरक्षण बंधारा बांधण्यात आला होता. हा बंधारा अचानकपणे फुटल्याने खाडीचे पाणी हे गावात शिकले व सर्वत्र पाणीच पाणी होऊन पूरस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीचा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी आढावा घेतला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामस्थांची चर्चा करून या वेळी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.