पनवेल मधील नागरी सुविधांसंदर्भात सिडको वसाहतीतील नागरिकांना भेडसावणारे प्रश्न लवकरात लवकर सुटावेत , तसेच त्या परिसरातील रखडलेली विकासकामे सिडकोने लवकरात लवकर करावीत, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे सह्व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांच्या समवेत विभागाच्या अधिकाऱ्यांची सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनात बैठक घेतली .

या बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी यापूर्वी मागणी केलेल्या सर्व विकासकामांचा आढावा घेतला .
नवीन पनवेल व खांदा कॉलोनी परिसरातील कचरा व्यवस्थापन योग्य रीतीने करावे , खांदा कॉलोनी ते खांदेश्वर रेल्वे स्टेशनला जोडणारा उड्डाण पूल तयार करावा , नवीन पनवेल खांदा कॉलोनी मधील मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी वाढीव चटई क्षेत्र मिळावा , रस्ते दुरुस्ती , तलावांचे शुशोभीकरण , रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसविणे , ठिकठिकाणी गार्डन तयार करणे , खेळांचे मैदान उपलब्ध करून देणे , सार्वजनिक शौचालय निर्माण करणे , गटार लाईनचे काम करणे आदी नागरी सुविधांची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी यापूर्वीच केली होती .