पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्युतीकरणासंदर्भातील सातत्याने उद्भवणारया समस्या, त्या सोडविण्यासाठी वापरण्यात येणारी परंपरागत पध्दत यामध्ये दुरूस्ती करावी तसेच आवश्यक पायाभूत सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी ना. बावनकुळे यांच्याकडे केली होती.याची दखल घेत राज्याचे ऊर्जा, नविन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबर्इ येथे त्यांच्या दालनात अधिकारयांसमवेत बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरणाच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कोकण विभागीय संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित अधिकारयांची बैठक होऊनही विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही झालेली नाही. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी योग्य ती उपाययोजना होणे गरजेचे आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठकीत नमूद केले. विद्युतसंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी कटीबध्द असून कर्तव्यात हलगर्जीपणा करणारया वीजवितरणच्या अधिकारी,कर्मचारयांवर कडक कारवार्इ करण्याचे निर्देश मा.चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर वीज ग्राहकांच्या प्रश्नांची व समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच पनवेलमध्ये जनता दरबारचे आयोजन करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्युतीकरणासंदर्भातील सातत्याने उद्भवणारया समस्या, त्या सोडविण्यासाठी वापरण्यात येणारी परंपरागत पध्दत यामध्ये दुरूस्ती करावी तसेच आवश्यक पायाभूत सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी ना. बावनकुळे यांच्याकडे केली होती.याची दखल घेत राज्याचे ऊर्जा, नविन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबर्इ येथे त्यांच्या दालनात अधिकारयांसमवेत बैठक आयोजित केली होती.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरणाच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कोकण विभागीय संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित अधिकारयांची बैठक होऊनही विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही झालेली नाही. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी योग्य ती उपाययोजना होणे गरजेचे आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठकीत नमूद केले.
विद्युतसंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी कटीबध्द असून कर्तव्यात हलगर्जीपणा करणारया वीजवितरणच्या अधिकारी,कर्मचारयांवर कडक कारवार्इ करण्याचे निर्देश मा.चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर वीज ग्राहकांच्या प्रश्नांची व समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच पनवेलमध्ये जनता दरबारचे आयोजन करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.