• English
  • मराठी

गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन

सोसायटी मित्र मंडळ, भाजप वॉर्ड क्रमांक १९, मिडलक्लास हौसिंग सोसायटी कमिटी, पनवेल महापालिका आणि कोशिश फाउंडेशनच्या वतीने घरगुती गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन करण्याकरिता स्वतंत्र पिंप उपलब्ध करण्यात आले आहेत. दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे अत्यंत साध्या परंतु भावपूर्ण वातावरणात याठिकाणी विसर्जन झाले. विसर्जनाकरिता आलेल्या गणेशभक्तांना कोशिश फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.