• English
  • मराठी

कोकण शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या प्रचार

 

कोकण शिक्षक मतदार संघ निवडणुक – २०२३ भारतीय जनता पार्टी बाळासाहेबांची शिवसेना-रिपाई (अ) व इतर मित्र पक्षाचे लोकप्रिय उमेदवार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ नवीन पनवेल येथील विविध शाळांमध्ये विशेष सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांना उपस्थित राहून तेथील शिक्षकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यातील नेतृत्व गुणांची ओळख करून दिली व ज्ञानेश्वर यांनाच या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले.