आज आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला गेला. देशातही वेगवेगळ्या ठिकाणी योगचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नवी मुंबईतील वाशी सेक्टर ३० मधील ”सिडको प्रदर्शन केंद्र” येथे भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री ना. रवींद्र चव्हाण, रायगड जिल्हा अध्यक्ष भाजप आमदार प्रशांत ठाकूर,आमदार मंदा म्हात्रे,नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर सुधाकर सोनावणे,आयुषचे संचालक कुलदीपराज कोहली,संजय देशमुख,डॉ सावरीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्याचबरोबर मुंबई,नवी मुंबई,ठाणे मधील वैद्यकीय विध्यार्थी व डॉक्टर्स,सीआयएसएफचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवी मुंबईमध्ये आयोजित भव्य कार्यक्रमामध्ये प्रथम केंद्र सरकारच्या आयुष विभागाने बनवलेला योगासनाच्या ”कॉमन योग प्रोटोकॉल” चे सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर समर्थ व्यायाम शाळेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे योगपटूनी मल्ल खांबावरील योग प्रदर्शन केले. त्यानंतर प्रत्यक्ष योगाभ्यासास सुरवात झाली. हजारो नागरिकांनी यावेळी योगचे प्रकार उत्साहात करण्यास सुरवात केली. प्रत्येक प्रकारानंतर आनंदाने ओरडून उपस्थित एकमेकांना प्रोत्साहन देत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खूप कांही मिळविल्याचा आनंद दिसत होता.यावेळी उपस्थितांना सातत्याने योग करीत राहण्याची शपथ देण्यात आली.
आज आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला गेला. देशातही वेगवेगळ्या ठिकाणी योगचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नवी मुंबईतील वाशी सेक्टर ३० मधील ”सिडको प्रदर्शन केंद्र” येथे भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री ना. रवींद्र चव्हाण, रायगड जिल्हा अध्यक्ष भाजप आमदार प्रशांत ठाकूर,आमदार मंदा म्हात्रे,नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर सुधाकर सोनावणे,आयुषचे संचालक कुलदीपराज कोहली,संजय देशमुख,डॉ सावरीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्याचबरोबर मुंबई,नवी मुंबई,ठाणे मधील वैद्यकीय विध्यार्थी व डॉक्टर्स,सीआयएसएफचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबईमध्ये आयोजित भव्य कार्यक्रमामध्ये प्रथम केंद्र सरकारच्या आयुष विभागाने बनवलेला योगासनाच्या ”कॉमन योग प्रोटोकॉल” चे सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर समर्थ व्यायाम शाळेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे योगपटूनी मल्ल खांबावरील योग प्रदर्शन केले. त्यानंतर प्रत्यक्ष योगाभ्यासास सुरवात झाली. हजारो नागरिकांनी यावेळी योगचे प्रकार उत्साहात करण्यास सुरवात केली. प्रत्येक प्रकारानंतर आनंदाने ओरडून उपस्थित एकमेकांना प्रोत्साहन देत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खूप कांही मिळविल्याचा आनंद दिसत होता.यावेळी उपस्थितांना सातत्याने योग करीत राहण्याची शपथ देण्यात आली.