• English
  • मराठी

खारघर सेक्टर 11मधील केंद्रीय विहार संकुलातील रहिवाशांसोबत सुसंवाद साधला

खारघर सेक्टर 11मधील केंद्रीय विहार संकुलातील रहिवाशांसोबत सुसंवाद साधला. या सुसंवादा दरम्यान खारघर मधील नागरिकांच्या समस्या आणि मते जाणून घेऊन आगामी काळात या नागरिकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर पनवेल महापालिकेच्या मालमत्ता करासंदर्भात भूमिका मांडत तो कसा योग्य आहे व तो का भरला पाहिजे हे सांगितले आणि दुहेरी करातून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.