• English
  • मराठी

“रयत विज्ञान प्रदर्शन 2022″चे मा. खासदार लोकनेते श्री. रामशेठजी ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

कामोठे, पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेचे लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मधील “रयत विज्ञान प्रदर्शन 2022” चे मा. खासदार लोकनेते श्री. रामशेठजी ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून प्रदर्शनास भेट दिली आणि सहभागी विद्यार्थ्यांशी मनसोक्त संवाद साधला.
सशक्त भारत, सुदृढ भारत आणि सक्षम भारत घडवण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची साथ आवश्यक असून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवण्यासाठी या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्कूलच्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत अतिशय कल्पक विज्ञान प्रकल्प तयार केले होते. या विद्यार्थ्यांमधील कल्पकता यापुढेही अशीच वाढत राहो, यासाठी शुभेच्छा.