साहिल महिला बचत गटाकडून सुरू करण्यात आलेल्या रास्त भाव धान्य दुकानाचे उद्घाटन
पनवेल तालुक्यातील दुंदरे येथे साहिल महिला बचत गटाकडून सुरू करण्यात आलेल्या रास्त भाव धान्य दुकानाचे उद्घाटन केले. साहिल महिला बचत गटाच्या या नव्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
सर्वसामान्य कुटुंबातील महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकते, हे आपण राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मु यांच्याकडून शिकले आहे. महिलांनी जिद्दीने एखादी गोष्ट ठरवली तर त्या कोणत्याही क्षेत्रात यशाचे शिखर गाठू शकतात. त्यामुळे साहिल महिला बचत गटानेही सरकारच्या विविध कल्याणकारी योजना महिलांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.