• English
  • मराठी

खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात ‘क्षितिज’ या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात ‘क्षितिज’ या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रथमतः पुलवामा येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली आणि नंतर परीक्षा केंद्राचे उदघाटन करण्यात आले. या सोहळ्यामध्ये शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखणीय कामिगिरी करण्यार्‍या विद्यार्थ्यांचा मान्यवराच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. तसेच या वेळी शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.