जगाला सत्य व अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. mah
जगाला सत्य व अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत या पदयात्रेबद्दल माहिती देण्यात आली. जात- पात, धर्म- पंथ, प्रांत- पक्ष अशा सर्वांच्या वर असलेले #महात्मा_गांधी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने भाजपाच्या वतीने ०२ ऑक्टोबर ते ३० जानेवारी या चार महिन्याच्या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदार संघात एकूण १५० किलोमीटर पदयात्रा काढण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक ०२ ऑक्टोबर २०१८ रोजी राज्यभरात एकाच दिवशी पदयात्रेच्या प्रारंभ होणार असून बुधवार दिनांक ३० जानेवारी २०१९ रोजी एकाच दिवशी समारोप होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात चार, नोव्हेंबरमध्ये तीन, डिसेंबर मध्ये पाच तर जानेवारी महिन्यात तीन अशा एकूण १५ पदयात्रा होणार आहेत. पनवेलमध्ये या पदयात्रेच्या शुभारंभ मालडुंगे येथे सकाळी ०८ वाजता होणार आहे. महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रेत सर्वानी सहभागी व्हावे, तसेच आपल्या परिसरात स्वच्छता करून बापूजींना आदरांजली अर्पण करावी.