सिडको हद्दीतील प्रत्येक भागात पुरेसा व नियमित पाणी पुरवठा झाला पाहिजे, यासाठी उपाययोजना करण्यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाणी पुरवठा केंद्रांना भेट देऊन या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
सिडको हद्दीतील प्रत्येक भागात पुरेसा व नियमित पाणी पुरवठा झाला पाहिजे, यासाठी उपाययोजना करण्यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाणी पुरवठा केंद्रांना भेट देऊन या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. शहरांचे शिल्पकार असलेल्या सिडकोच्या काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. नागरिकांच्या राहणीमानात सर्वांगीण सुधारणा झाली पाहिजे. त्या अनुषंगाने नागरिक आणि सिडकोच्या जिव्हाळ्याचा प्रश्न निकाली लावण्यासाठी सिडकोच्या वेश्वी, हमरापूर आदी ठिकाणच्या पाणी वितरित केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व नियमित होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेता, पाईपलाईन तसेच आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करण्याचे काम करण्यासोबत तात्काळ उपाययोजना व दीर्घकालीन उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.