मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्याने करण्यात येणार आहे.
मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून डिजिटल पद्धतीने रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि रोहा येथून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी एकाचवेळी दिवा-पनवेल-रोहा या ट्रेनचा शुभारंभ केला. याचबरोबर पुणे-कर्जत-पनवेल पॅसेंजर विस्तारीत सेवेचाही डिजिटल पद्धतीने रेल्वेमंत्री गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.