पनवेल येथे जिल्हा व सत्र न्यायालयासाठी इमारत बांधण्यासंदर्भात मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.
पनवेल येथे जिल्हा व सत्र न्यायालयासाठी इमारत बांधण्यासंदर्भात मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. या संदर्भात निवेदनही दिले आहे. जनतेचा व वकील वर्गाचा अलिबाग येथे जाण्याचा वेळ वाचावा व त्यांची सोय व्हावी या हेतूने मा. उच्च न्यायालयाने पनवेल येथे जिल्हा व सत्र न्यायालय स्थापनेस मंजुरी दिली. नवीन न्यायालयीन इमारतीमध्ये अतिरिक्त दोन मजले उभारण्याची सुविधा असून हे दोन मजले उभारल्यास दिवाणी व फौजदारी न्यायालये एकाच छत्राखाली येऊन जनतेची व वकील वर्गाची सोय होईल. त्यामुळे पनवेल येथील नवीन न्यायालयाच्या विस्तारिकरणाचा प्रस्ताव तात्काळ तयार करण्याबाबत आणि त्यास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता उपलब्ध करण्याची कार्यवाही करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यास सूचित करण्यात यावे, असेही या निवेदनात नमूद केले आहे.