“हुतात्मा दिन” गौरवशाली आणि शौर्यशाली लढयाचा ३५ वा स्मृतीदिन.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्काकरिता १९८४ साली प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यातील जासई येथे प्रकल्पग्रस्तांनी तीव्र आंदोलन उभे केले होते. या गौरवशाली आणि शौर्यशाली लढयात १६ जानेवारी १९८४ रोजी चिर्ले येेथील नामदे्व शंकर घरत, धुतूम येथील रघुनाथ अर्जुन ठाकूर हे हुतात्मे झाले. दरवर्षी या लढयात हुतात्म्य आलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यात येते. या गौरवशाली आणि शौर्यशाली लढयाचा ३५ वा स्मृतीदिन महात्मा फुले सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने जासई येथे साजरा करण्यात आला. रायगड जिल्हयाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.