ज्येष्ठ नागरिक व प्रवचनकार यांच्या सन्मान
रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते असे नावलौकिक असणारे लोकनेते मा.श्री. रामशेठ ठाकूर यांच्या 71 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज ज्येष्ठ नागरिक व प्रवचनकार यांच्या सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सन्मान सोहळ्यास मा. राज्यमंत्री श्री. संजयजी ऊर्फ बाळा भेगडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर लोकनेते रामशेठजी यांनी स्वतः या सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविले. तसेच उरणचे आमदार श्री.महेशजी बालदी आणि शहरातील अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मी देखील या सन्मान सोहळ्यात सहभागी झालो.