• English
  • मराठी

उरण शेतकरी लढ्यातील पागोटे येथील हुतात्म्यांना अभिवादन

 

उरण तालुक्यात १९८४ साली शेतकऱ्यांचा गौरवशाली लढा झाला होता. त्या लढ्यात उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोलाचे योगदान दिले होते. या लढ्यात पागोटे येथील हुतात्मा महादेव हिरा पाटील, हुतात्मा केशव महादेव पाटील, हुतात्मा कमळाकर कृष्णा तांडेल यांनी हौतात्म्य पत्करले होते. या हुतात्म्यांच्या ३९ व्या स्मृतीदिनानिमीत हुतात्मा महादेव हिरा पाटील, हुतात्मा केशव महादेव पाटील, हुतात्मा कमळाकर कृष्णा तांडेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.