• English
  • मराठी

कामगार विश्वातील ऐतिहासिक करार…

जय भारतीय जनरल कामगार संघटना सातत्याने कामगारांच्या हितासाठी धडपडत असते. अनेकदा कंपनी आणि कामगार यांच्यात संघर्ष होतो, त्यामुळे दोघांमध्ये समन्वय राहत नाही, त्या कारणाने व्यवस्थापन कामगारांकडे दुर्लक्ष करते. मात्र जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत आणि त्यांच्या टीमने सातत्याने याकडे प्रकर्षाने लक्ष दिले आहे. कामगार आणि कंपनी यांची प्रगती झाली पाहिजे हा एकमेव उद्दिष्ट घेऊन ते सतत काम करीत आहेत.
आज जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये असेल्या डाऊ केमिकल्स इंटरनॅशनल प्रा. लिमिटेड कंपनीमधील कंत्राटी भरघोस वेतनवाढीचा करार पार पडला.
चार वर्षांसाठी झालेल्या करारानुसार पहिल्या वर्षी ०४ हजार, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी प्रत्येकी ०३ हजार, तर चौथ्या वर्षी २५०० रुपये अशी एकूण १२ हजार ५०० रुपयांची पगारवाढ करण्याबरोबरच थकबाकी, ०३ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, बोनस व इतर सर्व सोयीसुविधा देण्याचे मान्य झाले. या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.