पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पनवेल व नवीमुंबई भागात विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
रचनात्मक विकासासाठी कायद्याच्या चौकटीत राहून महसुली आणि भांडवली जोड द्यावी लागते. त्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोघांनी समन्वयाने योग्य पाऊले उचलली तरच विकास होतो, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी पनवेल येथे केले. पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पनवेल व नवीमुंबई भागात विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमांना महापौर डॉक्टर कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिति अध्यक्ष मनोहर म्हात्रे, महिला व बाल कल्याण सभापती लिना गरड, माजी उपमहापौर चारुशीला घरत, जगदीश गायकवाड, अभिमन्यु पाटील, एकनाथ गायकवाड, दिलीप पाटील, चंद्रकांत सोनी, उपायुक्त जमीर लेंगरेकर, संध्या बावनकुळे, माजी सभापती दर्शना भोईर, मनोज भुजबळ, डॉक्टर अरुणकुमार भगत, विद्या गायकवाड, अरुणशेठ भगत, जयंत पगडे, अमित जाधव आणि संजय पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.