गाढी नदी पाहणी
पनवेल महापालिका हद्दीमधील प्रभाग क्रमांक १४, १८ आणि १९ या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानंतर गाढी नदीची पाण्याची पातळी वाढून आजूबाजूच्या परीसरामध्ये पुरस्थीती निर्माण होते. याकडे कटाक्षाने लक्ष देत आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह या परिसराची पाहणी केली. या वेळी आयुक्तांनी गाढी नदी लगत संरक्षण भिंत लवकरात लवकर बांधण्यात येईल असे आश्वासन दिले.
या वेळी पनवेल महापलिकेचे नगरसेवक मनोहर म्हात्रे , शहर उप अभियंता संजय कटेकर यांच्यासह स्थानिक रहिवाशी आदी उपस्थित होते.