• English
  • मराठी

पनवेल महापालिकेच्या मा. उपमहापौर चारुशीलाताई घरत यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

 

पनवेल महापालिकेच्या मा. उपमहापौर चारुशीलाताई घरत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. यानिमित्त नवीन पनवेल सेक्टर १६ येथील सिडको गार्डन मध्ये मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन केले आणि चारुशीला ताईंना पुस्तक भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अपोलो हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजीत करण्यात आलेल्या या शिबिराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.