“सेवा पंधरवडा” अंतर्गत नवीन पनवेल सेक्टर 2 येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न
देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सेवाकार्य असलेल्या सेवा पंधरवडाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यामतून विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत नवीन पनवेल सेक्टर २ येथील कर्नाटक हॉलमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व आयोजकांचे कौतुक केले. या शिबिरात ब्लड प्रेशर, डोळे तपासणी व चष्मे वाटप, ईसीजी, रक्त तपासणी यांसारख्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. या शिबिराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, अनेक गरजू नागरीकांनी या शिबीराचा लाभ घेतला.