रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील ज्येष्ठ पत्रकार कै. संतोष पवार यांच्या अकाली निधनाने माजी खासदार व लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर साहेब यांनी शोक व्यक्त करुन पवार कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. या मदतीचा धनादेश नेरळ येथे जाऊन पवार कुटुंबीयांकडे सुपूर्द केला.

संतोष पवार हे कोविड काळातदेखील काम करीत होते. त्यामुळे त्यांचा झालेला मृत्यू लक्षात घेऊन संतोष पवार यांना कोरोना योद्धा जाहीर करावे आणि त्यांना शासनाच्या विमाकवचचा लाभ देण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी सांगितले .