• English
  • मराठी

खारघर येथील ए. आर. पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन रायगडचे माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते

खारघर येथील ए. आर. पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन रायगडचे माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, प्रवीण पाटील, निलेश बावीस्कर, अ‍ॅड. नरेश ठाकूर, रामजी बेरा, शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, वासुदेव पाटील आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या सोबत हॉस्पिटलची पाहणी केली .