• English
  • मराठी

राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद जी किल्ले रायगडास भेट देण्यासाठी आले असता रायगडास भेट देण्याचे भाग्य लाभले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, स्वराज्याची राजधानी असलेला दुर्गराज रायगड!
राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद जी किल्ले रायगडास भेट देण्यासाठी आले असता रायगडास भेट देण्याचे भाग्य लाभले.
किल्ले रायगड म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय. महाराष्ट्रातील माणसाचा अभिमान, मराठी संस्कृतीचे प्रतिक आणि सह्याद्रीचे रत्न म्हणजे दुर्गराज रायगड !
पुन्हा एकदा रायगडावर इतिहासाच्या पाऊलखुणा अनुभवल्या.. याच रायगडाने शिवराज्याभिषेक पाहिला त्याच भूमीने तानाजी, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे अशा कैक वीरांच्या शौर्यगाथा रचिल्या..