• English
  • मराठी

दीपावली’ म्हणजेच ‘दीपोत्सव’… दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव !

तिमिरातूनी तेजाकडे…
दीपावली’ म्हणजेच ‘दीपोत्सव’… दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव !
या दीपोत्सवानिमित्त कोरोनामुळे निर्माण झालेली निराशेची काळजी दूर सारून सारीकडे आशेच्या नवकिरणांचा संचार व्हावा
यासाठी पनवेल महापालिकेमार्फत सुशोभीकरण करण्यात आलेल्या वडाळे तलाव येथे भाजप पनवेल शहर मंडलच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या दीपोत्सवात सहकुटुंब भेट दिली. वडाळे तलावाला सुमारे ४००० दिव्यांची आरास करण्यात आली होती, ज्यामुळे तलाव परिसर दिव्यांच्या तेजोमय प्रकाशाने उजळून निघाला होता.