• English
  • मराठी

लोकनेते स्व. दि.बा. पाटील साहेब यांच्या जयंती निमित्त “दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्या”चे आयोजन

 

प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ, माजी खासदार, लोकनेते स्वर्गीय दि.बा. पाटील साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय मुंबई विभाग, कोकण भवन नवी मुंबई व लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्ष कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले सभागृहात “दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून मेळाव्यासाठी आलेल्या तरुणांना मार्गदर्शन केले तसेच या मेळाव्यामुळे अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे कौतुक व आभार व्यक्त केले.