आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त आणि फक्त दि. बा पाटील
शेतकऱ्यांचा, भूमिपुत्रांचा, कष्टकऱ्यांचा योद्धा होते दि. बा
या मातीत जन्मलेले रत्न होते दि. बा
म्हणूनच आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त आणि फक्त दि. बा पाटील
नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचेच नाव देण्यात यावे.
आता आंदोलन अधिकच भव्य होत आहे. शहरापासून तळागाळातील सर्व भूमिपुत्र आता या ऐतिहासिक लढ्यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे समाजाच्या भावनांचा सरकारने तातडीने विचार करावा.
या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्री श्री. रामदास आठवले तसेच ठाणे पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. तसेच कृती समितीच्या वतीने सात ही जिल्ह्यामध्ये 10 जून रोजी मानवी साखळी आंदोलन आयोजित केले आहे.
यावेळी अध्यक्ष दशरथ पाटील, खासदार. श्री कपिलजी पाटील, माजी मंत्री श्री. जगन्नाथ पाटील, उपमहापौर जगदीशभाई गायकवाड, आगरी समाजातील मूख्य मान्यवर उपस्थित होते..