• English
  • मराठी

लोकनेते ‘दिबां’ ना सांस्कृतिक आदरांजली

लोकनेते ‘दिबां’ ना सांस्कृतिक आदरांजली

एकविरा कला संस्थेच्यावतीने दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील साहेबांना सांस्कृतिक आदरांजली अर्पण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील साहेबांचे नाव देण्यासाठी ज्यांनी लढा दिला त्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त या नेत्रदीपक सोहळ्यास उपस्थित राहून आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

एकविरा कला संस्थेचे श्री. तेजस पाटील हे कलेच्या माध्यमातून समाजसेवेचे मोलाचे कार्य करत आहेत. त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक !