रायगड जिल्ह्यातील पनवेल रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून, या कामाची पाहणी करण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी, तसेच वाढत्या रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे यासाठी सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पनवेल येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय व २० खाटांचे ट्रॉमा केअर युनिट सुरु होणार आहे. या रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून, या कामाची पाहणी करण्यात आली. या वेळी सभागृह नेते श्री. परेश ठाकूर, नगरसेवक श्री. अनिल भगत, श्री. नितीन पाटील, श्री. अमर पाटील, डॉक्टर अरुणकुमार भगत तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.