पाली देवद-सुकापूर येथील समृध्दी भूमी सोसायटी ते एक्स्प्रेस वेपर्यंतच्या मार्गावर डांबरीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे.
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत स्थानिक विकास निधीतून पाली देवद-सुकापूर येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. पाली देवद-सुकापूर येथील समृध्दी भूमी सोसायटी ते एक्स्प्रेस वेपर्यंतच्या मार्गावर डांबरीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे.