• English
  • मराठी

मराठमोळा पैलवान राहुल आवारे यांना अद्वितीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन

मराठमोळा पैलवान राहुल आवारे याने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपद मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे राहुल आवारे हा जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक जिंकणारा महाराष्ट्रातील पहिला पैलवान आहे. महाराष्ट्रातील क्रीडापटूंना प्रेरणादायी ठेरलेल्या राहुल आवारे यांना अद्वितीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी सहृदय सदिच्छा!