ग्रामपंचायत कर्मचार्यांचा पनवेल महापालिकेच्या सेवेत आपली सेवा देण्यासाठी समावेश झाला आहे यासाठी त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!!
पनवेल महापालिकेची 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींचा समावेश महापालिकेत करण्यात आला. या ग्रामपंचायतींमध्ये काम करणार्या कर्मचार्यांनी महापालिकेत समावेश व्हावा या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन केले होते. महापालिकेच्या या समावेशन प्रकियेला जिल्हा परिषदेकडून आवश्यक सहकार्य न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया लांबली. कर्मचारी समावेशनासाठी नगरविकास विभागाने कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. कोकण आयुक्तांनी नगरविकास विभागाला हा अहवाल 25 जानेवारी 2019 रोजी दिला. अहवाल सरकारला सादर करूनही त्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने कर्मचार्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.
ग्रामपंचायत कर्मचार्यांचा पनवेल महापालिकेच्या सेवेत आपली सेवा देण्यासाठी समावेश झाला आहे, यासाठी त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!!