जनार्दन भगत शिक्षणसंस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त सीकेटी कॉलेजने ‘इस्रो अंतराळ प्रदर्शन’ आयोजित केले आहे.
जनार्दन भगत शिक्षणसंस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त सीकेटी कॉलेजने ‘इस्रो अंतराळ प्रदर्शन’ आयोजित केले आहे. अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताने नेहमीच उत्तुंग कामगिरी केली आहे. यात ‘इस्रो’ या संस्थेचे योगदान फार महत्त्वाचे आहे. महाविद्यालयीन मुलांना अवकाश शास्त्राची जवळून ओळख व्हावी आणि यातून प्रेरणा घेउन अनेक भावी वैज्ञानिक तयार व्हावेत याकरता हे प्रदर्शन आयोजित केले आहे. आजचा प्रदर्शनाचा पहिला दिवस.. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.