पनवेल अर्बन बँक निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल !
पुढील महिन्यात होणाऱ्या पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी पनवेल तालुका व शहर भाजपच्या कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. या विशेष प्रसंगी पनवेल मधील भाजपाच्या अनेक प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह सहभागी होऊन निवडणुकीतील विजयासाठी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
पनवेलअर्बन बँकेचा उत्कर्ष व्हावा, या उद्देशाने या निवडणुकीतील सर्वसाधारण जागेसाठी श्री. अजय यशवंत कांडपिळे, श्री. बळीराम नारायण म्हात्रे, श्री. यतीन शशिकांत देशमुख, श्री. श्रीनंद मुकुंद पटवर्धन, श्री. भगवान तुकाराम मुकादम, असिफ हसन करेल, श्री. कृष्णा सिताराम पाटील, श्री. भगवान शंकर पाटील, महिला प्रतिनिधी म्हणून सौ. प्रमिला जयराम मुंबईकर, सौ. निकिता निवृत्ती नावडेकर, अनुसूचित जाती-जमाती जागेसाठी श्री. महेंद्र जानू गायकवाड, इतर मागासवर्गीय जागेसाठी श्री. प्रल्हाद गोविंद केणी, भटक्या विमुक्त जमाती जागेकरिता सौ. सुहासिनी दिनेश केकाणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.