हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्वाज्वल्य शूरतेचा पराक्रमाचा इतिहास डोळ्या समोर कायम रहावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्ताने जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या “गर्जा महाराष्ट्र: महाराष्ट्राची गर्जना” या तीन दिवसांच्या विशेष कार्यक्रमात पहिल्या दिवशी हजारो नागरिकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देणाऱ्या शिवकालीन शस्त्रांची ओळख व्हावी तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून त्या काळातील इतिहास उलगडावा यासाठी शस्त्र प्रदर्शन तसेच शिवकालीन नाणी प्रदर्शन महाराजांच्या कार्याची महती सांगण्यासाठी शिवकिर्तन व पोवाडे गायन स्पर्धा किल्ले प्रतिकॄती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. एमएसर्इबी मैदानावर भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी शहरातून शिवपालखीची ढोल ताशाच्या गजरात व शिवरायांच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली .
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्वाज्वल्य शूरतेचा पराक्रमाचा इतिहास डोळ्या समोर कायम रहावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्ताने जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या “गर्जा महाराष्ट्र: महाराष्ट्राची गर्जना” या तीन दिवसांच्या विशेष कार्यक्रमात पहिल्या दिवशी हजारो नागरिकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देणाऱ्या शिवकालीन शस्त्रांची ओळख व्हावी तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून त्या काळातील इतिहास उलगडावा यासाठी शस्त्र प्रदर्शन तसेच शिवकालीन नाणी प्रदर्शन महाराजांच्या कार्याची महती सांगण्यासाठी शिवकिर्तन व पोवाडे गायन स्पर्धा किल्ले प्रतिकॄती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
एमएसर्इबी मैदानावर भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी शहरातून शिवपालखीची ढोल ताशाच्या गजरात व शिवरायांच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली .