• English
  • मराठी

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ( RSS ) , नवीन पनवेल रोटरी क्लब , नवीन पनवेल आंध्र कला समिती , कर्नाटका संघ नवीन पनवेल आणि सहयोग स्नेह सेवा संस्था नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले. या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावून, आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे अनुषंगाने सहकार्य केले. या रक्तदान शिबिरास पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.