पनवेल(प्रतिनिधी) २६ /११ च्या पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा प्रतिकार करून देशरक्षण करणाऱ्या शहीद वीर जवान, पोलिसांना व निष्पाप नागरिकांना भारतीय जनता युवा मोर्चा कामोठेतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. २६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भ्याड हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात महाराष्ट्र पोलीस, व अनेक निष्पाप भारतीय नागरिक तसेच ३४ परदेशी नागरिकांसह १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कामोठे शहर भाजपा युवा मोर्च्यातर्फे सत्यकेतु चौक येथे शहीदवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभापती विकास घरत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, राजश्री वावेकर, युवा नेते हैपी सिँग, अमोल सैद, रमेश म्हात्रे, एकनाथ कुंभार, महिला मोर्चा अध्यक्षा विद्या तामखेडे, जयश्री धापते, हर्जीदर कौर, संजय कराले यांच्यासह नागरिकांनी श्रध्दांजली अर्पण केली. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस अक्षय ननावरे, संतोष परमेश्वर यांनी केले.
पनवेल(प्रतिनिधी) २६ /११ च्या पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा प्रतिकार करून देशरक्षण करणाऱ्या शहीद वीर जवान, पोलिसांना व निष्पाप नागरिकांना भारतीय जनता युवा मोर्चा कामोठेतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भ्याड हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात महाराष्ट्र पोलीस, व अनेक निष्पाप भारतीय नागरिक तसेच ३४ परदेशी नागरिकांसह १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कामोठे शहर भाजपा युवा मोर्च्यातर्फे सत्यकेतु चौक येथे शहीदवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभापती विकास घरत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, राजश्री वावेकर, युवा नेते हैपी सिँग, अमोल सैद, रमेश म्हात्रे, एकनाथ कुंभार, महिला मोर्चा अध्यक्षा विद्या तामखेडे, जयश्री धापते, हर्जीदर कौर, संजय कराले यांच्यासह नागरिकांनी श्रध्दांजली अर्पण केली. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस अक्षय ननावरे, संतोष परमेश्वर यांनी केले.