उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा तर्फे पूजा चव्हाणला न्याय मिळावा या मागणीसाठी राज्य सरकार विरोधात, कळंबोली मॅकडोनाल्ड जवळ चक्का जाम आंदोलन!
पूजाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप असलेले मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. पूजाला न्याय मिळालाच पाहिजे. यावेळी यामध्ये उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सौ. अश्विनी पाटील, सरचिटणीस सौ. मृणाल खेडकर, महापौर डॉ कविता चौतमोल, मा.उपमहापौर सौ. चारुशीला घरत तसेच कामोठे, खारघर, कळंबोली, पनवेल, खोपोली मधील सर्व महिला मोर्चाच्या अध्यक्षा, सरचिटणीस, पदाधिकारी आणि सर्व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.