• English
  • मराठी

भाजपकडून वडाळे तलाव येथे ‘दीपोत्सव”चे आयोजन

सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणि आनंदाचा प्रकाश पडावा आणि सारीकडे आशेच्या नवकिरणांचा संचार व्हावा यासाठी पनवेल मधील सुप्रसिद्ध “वडाळे तलाव” येथे भाजप पनवेल शहर मंडलच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या दीपोत्सवात सहर्ष सहभागी होऊन सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. या दीपोत्सवानिमित्त वडाळे तलावाला सुमारे ४००० दिव्यांची आरास करण्यात आली होती, ज्यामुळे तलाव परिसर दिव्यांच्या तेजोमय प्रकाशाने उजळून निघाला होता.