• English
  • मराठी

गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त कामोठे येथील नालंदा बुद्ध विहार येथे अभिवादन

संपूर्ण जगाला सत्य, शांती, मानवतेच्या सेवेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६६ जयंतीनिमित्त सोमवारी आनंद बुद्ध विहार ट्रस्ट, कामोठे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कामोठे शहर यांच्या वतीने कामोठे येथील नालंदा बुद्ध विहार येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित राहून बुद्धांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.