“जैव विविधता व्यवस्थापन समिती”
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील दुर्मिळ, वनौषधी जैव विविधतेचे जतन व्हावे, संवर्धन व्हावे, याहेतूने पनवेल महानगरपालिकेची “जैव विविधता व्यवस्थापन समिती” स्थापन करण्यात आलेली आहे. स्थानिक परिसरातील वनौषधी वनस्पती माहित करून घेणे, त्याचे जतन करणे, दुर्मिळ आणि अत्यावश्यक वनस्पतीचे पेटंट घेऊन स्थानिकांना त्याचा आर्थिक लाभ मिळवून देण्याचे कार्य देखील या समितीमार्फत होणार आहे.
या बैठकीस महापौर, नगरसेवक, महानगरपालिका अधिकारी, रायगड जिल्हयातील तसेच पनवेल शहरातील विविध पर्यावरण अभ्यासक, नगरसेवक, कृषी अधिकारी, कोळी बांधव, स्वयंसेवी संघटना, अदिवासी विभागाचे अधिकारी, सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ, पक्षीतज्ञ उपस्थित होते.
या समितीच्या कामाबद्दल अवलोकन करून जैव विविधतेच्या संवर्धनासाठी कोणत्या कोणत्या उपाय योजना करता येतील यावर चर्चा केली.