• English
  • मराठी

आसूडगावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न !

 

पनवेल महानगरपालिकेच्या मा. नगरसेविका सौ. चंद्रकला शशिकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पनवेल महानगरपालिकेमार्फत मंजूर करण्यात आलेल्या आसुडगावातील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. सदर कार्यक्रमास उपस्थित राहून आसुडगावातील नवे समाज मंदिर, रस्ते काँक्रीटीकरण, पाण्याच्या टाकीचे सुशोभीकरण, पाण्याची नवीन लाईन टाकणे, ड्रेनेज लाईन टाकणे, ओपन जीम आणि हायमास्क लावणे आदी विकासकामांचे भूमिपूजन केले. यावेळी स्थानिक रहिवासी, नगरसेवक तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.