• English
  • मराठी

भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष एकनाथ देशेकर यांच्या पुढाकाराने चिंध्रणमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन झाले.

भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष एकनाथ देशेकर यांच्या पुढाकाराने चिंध्रणमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन झाले. यात अंतर्गत गटारे, कसाडी नदीवरील पुलाचे नूतनीकरण, सभामंडप, गणेशघाट, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी, तसेच रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि पेव्हर ब्लॉक बसविणे आहे. या कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, योगेश तांडेल, जितेंद्र तिवारी, अनंता पाटील, शिवाजी दुर्गे, कमला देशेकर, बंडूशेठ, दशरथ काका आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.