महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील नोंदित बांधकाम कामगारांना लाभ वाटप सोहळा
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील नोंदित बांधकाम कामगारांना लाभ वाटप सोहळा फोर कोर्ट एरिया, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, खांदेश्वर, नविन पनवेल येथे ना.संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्यास राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका व इतर मान्यवर उपस्थित होते. इमारत बांधकाम कामगारांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासन कटिबद्ध असून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना शिक्षण, आरोग्य, निवास या सुविधा पुरविण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाने २८ योजना तयार केल्या आहेत, असे प्रतिपादन राज्याचे कामगार, कौशल्य विकास व उद्योजकता कामगार, भूकंप पुनर्वसन माजी सैनिकांचे कल्याण मंत्री ना.संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी येथे केले