• English
  • मराठी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या “हर घर तिरंगा” या विशेष मोहिमेअंतर्गत कामोठे शहरातील घरोघरी तिरंगा वाटपास सुरुवात झाली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या “हर घर तिरंगा” या विशेष मोहिमेअंतर्गत कामोठे शहरातील घरोघरी तिरंगा वाटपास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सोमवार दि. 8 ऑगस्ट ते गुरुवार दि. 11 ऑगस्ट पर्यंत भारतीय जनता पक्ष कार्यालय सेक्टर 36, कामोठे येथे “मोफत आधार कार्ड कॅम्प”चे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पच्या माध्यमातून कामोठ्यातील नागरिकांना नवीन आधार कार्डची नोंदणी, नाव, जन्मतारीख, पत्ता बायोमेट्रिक, ई-मेल आयडी इत्यादींमध्ये बदल करणे तसेच आधार मोबाईलशी लिंक करणे आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर या कॅम्पच्या उद्घाटन प्रसंगी माझ्यासह कामोठेतील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.