बोंबाबोंब आंदोलन
मराठा आरक्षणापाठोपाठ ओबींसीच्या आरक्षणालाही नाकर्त्या महाविकास आघाडी सरकारचा फटका बसला. ओबीसी समाजातील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने राज्यभरात आज बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर,आमदार संजयजी केळकर, आमदार अँड. निरंजनजी डावखरे, प्रदेश सचिव संदिपजी लेले, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिनजी केदारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यानंतर जिल्हाधिकारी राजेशजी नार्वेकर यांची भेट घेऊन आंदोलनकर्त्यांच्या भावना राज्य सरकारकडे पोचविण्याची विनंती यावेळी करण्यात आली.