दास्तान फाटा येथे रास्ता रोको आंदोलन
चाळीस वर्षे प्रलंबित असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर सिडको उदासीनता दाखवत असल्याने भूमिहीन झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा असंतोष खदखदत आहे. याच संदर्भात माझ्यासमवेत उरणचे आमदार श्री. महेशशेठ बालदी यांनी सिडको सोबत बैठक घेतली. परंतु या बैठकीअंती काहीच ठोस आश्वासन न मिळाल्याने सिडको प्रति आपला निषेध व्यक्त करण्यासाठी कृती समितीच्या नेतृत्वाखाली 17 मार्चला सिडकोच्या वर्धापन दिनी काळा दिन पाळला जाणार असून दास्तान फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरवले आहे .