• English
  • मराठी

किरीटजी आप आगे बढ़ो हम आपके साथ है! 

महाविकास आघाडीमधील भ्रष्टाचारी नेते अनिल परब यांचे अनधिकृत रिसॉर्ट  तोडण्यासाठी हातात हातोडा घेऊन किरीटजी सोमय्या नावाचे वादळ मुंबईहून दापोलीला रवाना झाले. भ्रष्टाचारी महाविकास आघाडीच्या कुकर्मांवर घाव घालायला निघालेल्या किरीटजी सोमय्या यांना पळस्पे फाटा पनवेल येथे स्वागत करण्यात आले.   तसेच आम्ही सर्वजण आपल्या सोबत असल्याच्या सदिच्छा दिल्या.

महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी आंदोलन करत असताना  असंवेदनशील महाविकास आघाडी सरकार मात्र आमदारांना घरे वाटण्यात मग्न आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना साथ देण्यापेक्षा बॉम्बस्फोटातील आरोपींना संरक्षण देणे राज्य सरकारला जास्त फायद्याचे वाटते. राज्यातील जनता उपाशी असताना सत्ताधारी नेते मात्र भ्रष्टाचार करून आपले पोट भरत आहे. परंतु ते म्हणतात ना की प्रत्येक शेरास सव्वाशेर असतो. त्याप्रमाणे भाजप खासदार किरीटजी सोमय्या विकास आघाडी सरकारचा कर्दनकाळ ठरत आहेत. महाविकास आघाडीतील भ्रष्टाचारी नेत्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणायला किरीटजी सज्ज झाले आहेत. चला तर अशा लोकनेत्याला आपणही साथ देऊ. आणि म्हणून